e pik pahani last date maharashtra2023| ई पीक पाहणी 2023 शेवटची तारीख


  

 
नमस्कार, सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा तसेच शेती संदर्भातील सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर ई पीक पाहणी करणे अंत्यत अनिवार्य आहे . तर आपल्या पिकाची लवकरात लवकर पीक पाहणी करून घ्या आणि आपला शेतीचा पीक पेरा लाऊन घ्या सरकारने यासाठी आता मुदत वाढ देण्यात आलेली आहे 
        राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तलाठ्याकडे न जाता आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून शेतातील विविध पिकांची आपल्या ७/१२ उताऱ्यावर नोंद करण्यासाठी कृषी विभागाने 31 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदत दिलेली होती. मात्र मागील काही दिवसांपासून सर्व्हर तांत्रिक कारणाने डाऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी नोंद करता आली नाही. यामुळे ई-पीक पहाणीसाठी 25 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे पीक विम्यासाठी व इतर शासकीय योजनेसाठी असलेली ई-पीक पहाणी शेतकऱ्यांना पूर्ण करता येणार आहे.
    यावर्षी राज्य शासनाने १ रुपयात पीकविमा योजना उपलब्ध करुन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा भरला गेला. मात्र पिक विम्याचा लाभ मिळण्यासाठी जे पीक विमा करतांना नोंदवले आहे त्या पिकाची ई-पीक पाहणीमध्ये नोंद करणे होणे गरजेचे आहे
         क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणी अहवालाचा Real Time Crop Data संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच, सदर डाटा संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक पेरणी अहवाल प्रक्रीयेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे इत्यादी उद्देशाने पीक पेरणीबाबतची माहिती भ्रमणध्वनी वरील ॲप द्वारा गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वत: उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने (Farmer Friendly App) टाटा ट्रस्ट यांनी आज्ञावली विकसित केली आहे.
        तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात आलेली आहे. जिल्हयातील सर्व शेतकरी बंधु-भगिनीं, गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, बचत गट प्रतिनिधी, सहकारी संस्थाचे अध्यक्ष व सचिव, अध्यक्ष- शेतकरी दुध उत्पादक संघ, पाणी फाउंडेशन गट, पोकरा प्रतिनिधी, ग्रामरोजगार सेवक, तांत्रीक सहाय्यक, बँक प्रतिनिधी, शाळा व कॉलज विद्यार्थी, प्रगतशिल शेतकरी, सर्व ग्रामपंचायत समिती, पंचायत समिती व जिल्हा परिषदचे सदस्य, मिडिया प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी देखील शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पात सहभाग घेवून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी प्रोत्साहीत करावे. 


Post a Comment

0 Comments