जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे | Caste Validity Required Documents list in Marathi
1) नमुना 16 नियम 14
(यामध्ये ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत व त्यासोबत बोनाफाईड, नमुना 15 ॠ, प्राचार्य / मुख्याध्यापक यांचे सही व शिक्क्यासह फॉर्म)
2) जात प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत
3) नमुना नं 3 नियम 4 पालकांचे शपथपत्र (मुळ शपथपत्र) (100 रु स्टँँम्प पेपरवर)
(यामध्ये कुटुंबाची मुळ पुरुषापासुन ते वर्तमान पिढीपर्यंतची वंशावळ तसेच ज्या जातीचा दावा केलेला आहे त्या जातीची / जमातीची समाजशास्त्रीय, मानववंशशास्त्रीय वांशिक विशेष लक्षणे)
4) नमुना नं 17 नियम 14 पालकाचे शपथपत्र (मुळ शपथपत्र) (100 रु स्टँँम्प पेपरवर)
यामध्ये समितीस सादर केलेली कागदपत्रे / पुरावे यामध्ये फेरफार / दुरुस्ती / बदल केलेले नाही. ही खोटी अथवा नकली नाहीत असे सत्यप्रतिज्ञेवर लिहुन देणे. तसेच यापुर्वी महाराष्ट्रातील कोणत्याही जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज केला होता व माझे जात प्रमाणपत्र अवैध झाले आहे अशी बाब नाही अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे आणि पुरावे खोटे अथवा बनावट आढळल्यास मी त्यास जबाबदार असुन त्यासाठी भा.द.वि.कायद्यानुसार लागु होणाया शिक्षेस मी पात्र राहीन. अशा वरील आशयाचे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे.
5) नियम 16 नुसार खालील कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे आवश्यक (ऑनलाईन फॉर्म सोबत)
क) प्राथमिक शाळा सोडल्याचा किंवा इतर शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा प्रमाणपत्रांची सांक्षाकित प्रत
ख) नातेवाईकांच्या प्राथमिक शाळा सोडल्याचा किंवा इतर शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचा प्रमाणपत्रांची सांक्षाकित प्रत
ग) अशिक्षित व्यक्ती, अशिक्षित पालक किंवा नातेवाईक यांचे बाबतीत ज्यामध्ये वंशावळीनुसार कुटुंबातील सदस्यांची म्हणजेच पंजोबा किंवा आजोबा किंवा वडील किंवा सख्खे काका यांची जात नमुद केलेली आहे असा जन्म /मृत्यु नोंदवहीचा सक्षम प्राधिकायाने निर्गमित केलेला उतारा. (प्रमाणित प्रती) (गाव नमुना नं 12 / कोतवार बुक / राष्ट्रीयत्व नोंदवही)
घ) उपलब्ध असल्यास, ज्यामध्ये जात नमुद केली आहे अशा जुन्या महसुली दस्ताऐवजाच्या प्रमाणित प्रती.
ड) अनुज्ञेयतेच्या अधिन राहुन इतर संबधित पुरावा असल्यास
च) नियम 2 च्या खंड (ड) मध्ये विनिर्दिष्ट केलेले मानिव दिनंाक लक्षात घेता
इमाव प्रवर्गासाठी 13 ऑक्टोबर 1967
भटक्या जमातीसाठी- 21 नोव्हेंबर 1961
अनुसुचित जाती प्रवर्गासाठी-10 ऑगस्ट 1950
महाराष्ट्र राज्यातील कायम निवासाचा पुरावा.
छ) जवळच्या रक्तनातेवाईकांचा जातीदावा यापुर्वी वैध ठरला असेल तर जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे. अर्जदार व वैधता प्रमाणपत्र धारक व्यक्ती यांचे महसुली वारसहक्क नोंदीवरुन रक्तनातेसंबध सिद्ध करुन देणे आवश्यक आहे.
0 Comments