नमस्कार,आज आपण मुख्यमंत्री रोजगार योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग पाहुयात ,काय आहे मुख्यमंत्री रोजगार योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील, इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
राज्याची प्रगती करण्यासाठी उद्योग व व्यवसाय मोठ्या प्रमाणावर हातभार लावतात त्यामुळे नवीन उद्योग व्यवसायांना चालना देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केली आहे. राज्यांमध्ये सुशिक्षित युवक युवतींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या तरुण-तरुणींना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी पाठबळ देणे अंत्यत महत्वाचे ठरू शकते. केंद्र शासनाद्वारे प्रधानमंत्री रोजगार निर्ममती काययक्रम योजना आधीपासून आहे. परंतु या योजनेचे मर्यादित उद्दिष्ट लक्षात घेऊन तसेच वाढत जाणारे प्रस्ताव यामुळे स्वतंत्र प्रत्येक वेगवेगळी राज्याची योजना तयार केलेली आहे.
योजनेचे उद्दिष्ट
महाराष्ट्रातील व्यक्तींना आत्मनिर्भर बनवणे व स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक मदतीतून उभे करून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये एक लाख सूक्ष्म आणि लघु उपक्रम सुरू करणे. आणि याच माध्यमातून दहा ते बारा लाख रोजगार निर्मिती करणे. या योजनेचे अंमलबजावणी करण्यासाठी नोडल संस्था म्हणून महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाच्या अंतर्गत येणारे उद्योग संचालनालय मुंबई ची निवड करण्यात आली आहे. सहयोगी संस्था म्हणून या योजनेअंतर्गत बँका, नोडल बँका, उद्योजकीय प्रशिक्षण संस्था, ऑनलाईन प्रक्रियेसाठी सहाय्यभूत संस्था, अंमलबजावणी संस्था, केंद्र शासनाच्या संस्था यांचे सहाय्य घेण्यात येते. या योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव मंजूर झालेल्या प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांचे दोन आठवडे कालावधीचे निवासी उद्योजकीय प्रशिक्षण सक्तीचे असते.
वयोमर्यादा
कुठलेही स्थायी आर्थिक उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले असेल. जास्तीत जास्त वयोमर्यादा ४५ वर्ष. (इतर जाती-जमाती व आरक्षित कॅटेगिरी साठी पाच वर्षे शिथिल केलेली आहे )
शैक्षणिक अहर्ता
१. १०/-लाखावरील प्रकल्पासाठी सातवी उत्तीर्ण पात्रता हवी
२. २५/-लाखावरील प्रकल्पासाठी दहावी उत्तीर्ण पात्रता हवी
3. एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल ( येथे कुटुंबाची व्याख्या म्हणजे फक्त पती-पत्नी अशी असेल)
4. अर्जदार व्यक्तीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) अथवा इतर कोणत्या केंद्र अथवा राज्य शासनाच्या अन्य विभागाकडे कोणत्याही कसल्याही अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
फायदे व प्रकल्प किंमत
या योजनेमध्ये बँकेकडून मिळणारे कर्ज साठ ते सत्तर टक्के असेल व अर्जदाराने स्वतःचे भांडवल 5 टक्के ते 10 टक्के गुंतवणे अंत्यत गरजेचे आहे. शासनाच्या आर्थिक सहाय्य अनुदान स्वरूपात (मार्जिन मनी) 15 टक्के ते 35 टक्के असेल.
अर्ज कोठे व कसा करावा.
1. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे असूनसर्वप्रथम तुम्हाला cmegp या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
2. त्यानंतर होम पेजवर “online application form for individual” वर क्लिक करा.
3. पुढील पेजवर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे.
4. संपूर्ण माहिती भरून झाल्यावर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
5. सर्व माहिती भरून झाल्यावर व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यावर SAVE या बटणावर क्लिक करायचे आहे.
6. अशा पद्धतीने तुम्ही एप्लीकेशन पूर्ण भरू शकता.
निष्कर्ष -
ह्या लेख मध्ये मुख्यमंत्री रोजगार योजना या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि उद्दिष्ट ,ती योजना म्हणजे काय इत्यादी. महाराष्ट्रातील तरुण तरुणींना नऊ उद्योग सुरू करण्यासाठी हातभार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. बँकेमधून कर्ज उपलब्ध करून देण्यापासून उद्योगातील प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना मदत करते. मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल धन्यवाद

0 Comments