"digital cast certificate" जातीचा दाखला काढणेकामी आवश्यक कागदपत्रे


महाराष्ट्रात किंवा देशातील कोणत्याही राज्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र सादर करावं लागतं. अर्ज दाखल करताना जातीचे प्रमाणपत्र हे महत्वाचे कागदपत्र मानले जाते. शालेय शिक्षण सुरु असताना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आवश्यक असते. 

जातीचा पुरावा दर्शवणारी आवश्यक कागदपत्रे
  1. जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी ज्याचे प्रमाणपत्र काढायचे आहे त्याचे जात दर्शवणारे कागदपत्र आवश्यक असते. अर्जदार, त्याचे वडील अथवा आजोबांच्या प्राथमिक शाळा प्रवेश नोंदवहीचा उतारा,
  2. अर्जदार अथवा अर्जदाराच्या वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला लागतो. हे उपलब्ध नसल्यास इतर कागदपत्रांपैकी एक कागदपत्रं सादर करावे लागते.
  3. · वडील अथवा जवळच्या नातेवाईकाचा जन्म नोंदवहीचा उतारा
  4. · वडील अथवा जवळच्या नातेवाईकाच्या जात/समाजाचा उल्लेख असणारा शासकीय सेवा नोंदवहीचा उतारा
  5. · सामाजिक न्याय विभागाने जारी केलेले जात प्रमाणित करणारे कागदपत्र-अर्जदाराचे वडील अथवा जवळच्या नातेवाईकासाठी छाननी समितीने जारी केलेले वैधता प्रमाणपत्र
  6. · ग्राम पंचायत नोंद अथवा महसूल नोंदीची प्रत
  7. · जात अधिसूचित होण्याच्या तारखेपूर्वीच्या निवासाचे साधारण ठिकाण आणि जातीसंदर्भातील कागदोपत्री पुरावे
  8. ·सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले अन्य संबंधित कागदोपत्री पुरावे
जात प्रमाणपत्र काढताना एखादे कागदपत्र नसल्यास त्याऐवजी कोणते कागदपत्रं जोडायचे याची यादी आपले सरकार आणि शासनाच्या वेबसाईटवर मिळू शकते. किंवा नजीकच्या सेतू कार्यालयात संपर्क करा. आपले सरकार पोर्टलवर एकूण 52 प्रकारच्या कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे त्यापैकी एक कागदपत्र सादर करावं लागते.
वडिलांच्या जातीचा पुरावा उपलब्ध नसल्यास नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आणि नातेवाईकासोबतच्या नात्याचा तपशील देणारे वंशावळीचे शपथपत्र जोडावे लागते.

    आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र मिळून जाईल.

Post a Comment

0 Comments